रत्नागिरी:- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
श्री. मिश्रा यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या बदलीचे बनावट आदेश कोल्हापूरच्या एका भामट्याने जारी केले होते. तेव्हा रत्नागिरीतून करोना कमी होईपर्यंत आपली बदली होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र प्रशासकीय स्तरावर त्यांच्या बदलीचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातून करोना संपूर्णपणे गेला नसला, तरी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले, त्याच दिवशी एक हजार ३५ रुग्ण करोनामुक्त झाले, हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
श्री. मिश्रा यांनी अल्पावधीतच उत्तम काम केले होते. आता नवीन जिल्हाधिकारी कोण येणार याची उत्सुकता जिल्हावासीयांना आहे