रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात मुदत दिली आहे.
रत्नसागर रिसॉर्टप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानेही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची ९ कोटी २५ लाख रुपये इतकी नुकसानभरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते. संबंधित कारवाई संदर्भात तत्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. याच अनुषंगाने आज जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.