यूपीएससी परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरेची बाजी

रत्नागिरी:- नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत रत्नागिरीच्या चेतन पंदेरे या मुलाने या परीक्षेत बाजी मारली आहे. या निकालात चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग मिळाले आहे.

विशेष म्हणजे पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या नितीन पंदेरे यांचा मुलगा असून त्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचार्‍याच्या मुलाने यूपीएससी मध्ये यश मिळवण्याची कोकणातील ही पहिलीच घटना आहे. युपीएससी परीक्षेमध्ये चेतन पंदेरे यांला 416 व रँकिंग मिळाले आहे.