रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथील नवनिर्मिती फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणार्या व्यक्तींना देण्यात येतो. स्वतःचा व्यावसाय सांभाळून श्री. मलुष्टे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. आरोग्य शिबीरांसह क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध संस्थांच्या मागे उभे राहत त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. याच कामाची दखल नवनिर्मितीने घेतली आहे. या पुरस्काराचे वितरण 3 एप्रिलला सकाळी 11 वाजता आंबेड बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.









