यापुढे १९ फेब्रुवारीला प्रत्येकवर्षी मॅरेथॉनचे आयोजन: ना. सामंत 

रत्नागिरी:- माणसामधील खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि विजयानंतर उन्माद न बाळगण्याची मानसिकता तयार होते, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच १९ फेब्रुवारीला दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा ना. उदय सामंत यांनी यावेळी केली. 

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन २०२३ च्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन २०२३ चा शुभारंभ करण्यात आला.

     यावेUी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अभिवादन केले.  यापुढे दरवर्षी शिवजयंतीला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात एका क्रीडा प्रकाराची स्पर्धा यापुढे आयोजित करण्यात येतील. शासनाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धाही सुरु केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये नाव कमावतील, असे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.  रविवारच्या मॅरेथॉननमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी २१ कि.मी. अंतर धावून पूर्ण केल्याने पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 

     जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सांगितले, पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला असून मॅरेथॉननमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये १ हजार ५५५ जणांनी नोंदणी केल्याने हा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विजेतेपद मिळविण्यापेक्षा स्पर्धेतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या सहभागातून आनंद मिळावा, याकरिता या मॅरेथॉनचे नाव हॅप्पी मॅरेथॉन ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. 

  मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, पदक आणि प्राविण्य प्रमाणपत्र देवून पालकमंत्री ना. उदय सामंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे २१ कि.मी. महिला‚ प्रथम क्रमांक प्रमिला पांडुरंग पाटील, द्वितीय क्रमांक शिल्पा केंबळे,तृतीय क्रमांक योगिता तांबडकर, २१ कि.मी. पुरुष‚ प्रथम क्रमांक सिध्देश बर्जे, द्वितीय क्रमांक ओंकार बैकर, तृतीय क्रमांक समाधान पुकळे, १० कि.मी. महिला‚ प्रथम क्रमांक साक्षी संजय जड्याळ, द्वितीय क्रमांक प्रिया करंबेळे, तृतीय क्रमांक शमिका मणचेकर, १० कि.मी. पुरुष‚ प्रथम क्रमांक स्वराज संदिप जोशी, द्वितीय क्रमांक अमेय धुळप, तृतीय क्रमांक ओंकार चांदिवडे, ५ कि.मी महिला‚ प्रथम क्रमांक श्रुती दुर्गवळे, द्वितीय क्रमांक अमिता कुडकर, तृतीय क्रमांक सिध्दी इंगवले.      

     ५ कि.मी. पुरुष‚ प्रथम क्रमांक प्रथमेश चिले, द्वितीय क्रमांक ऋतूराज घाणेकर, तृतीय क्रमांक नितेश मायंगडे.  अठरा वर्षाखालील मुले‚मुली गट‚ मुली‚ प्रथम क्रमांक रिया स्वरुप पाडळकर, द्वितीय क्रमांक सांची कांबळे, तृतीय क्रमांक आर्ची नलावडे, चौथा क्रमांक राखी थोरे,मुले गट‚ प्रथम क्रमांक अथर्व चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रेयस ओकटे, तृतीय क्रमांक सुशांत आगरे, चौथा क्रमांक सौरभ घाणेकर,  

       दिव्यांग गट‚ सादिल नाकाडे. चौदा वर्षाखालील मुले, मुली‚ प्रथम क्रमांक अनुजा पवार, द्वितीय क्रमांक हुमेरा सय्यद, तृतीय क्रमांक कार्तीकी भुरवणे.  मुले‚ प्रथम क्रमांक साईप्रसाद वराडकर, द्वितीय क्रमांक वीर मेटकर, तृतीय क्रमांक ओम भोरे. या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.