मोर्डे लाडवाडीत सापडला मृतावस्थेत बिबट्या

देवरूख:- देवरुख तालुक्यातील मोर्डे लाडवाडी येथील  लाड यांच्या घराच्या मागच्या बाजूला बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. 

मोर्डे लाडवाडी येथे बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची माहिती मिळताच, विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक राहुल गुंठे आकाश कडूकर सुरज तेली सर्वश्री पाटील यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्या ची पाहणी केली व पंचनामा केला. तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ कांबळे यांनी या बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर या बिबट्यावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत वन विभागा मार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान दरम्यान शवविच्छेदन अहवालामध्ये या बिबट्याचा उपाशीपोटी असल्याकारणाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.