रत्नागिरी:- राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा आणि इंफीगो आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणीला शुक्रवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात 147 जणांनी सहभाग नोंदवला. या रुग्णांचे डोळे मोफत तपासण्यात आले. या शिबीरामध्ये मशीन द्वारे नेत्र तपासणी, पारंपरिक पध्दतीने नेत्र तपासणी, डोळ्याचे प्रेशर तपासणी, डोळ्यांतील नजरेबाबत सुयोग्य मार्गदर्शन तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले तसेच डोळ्या संदर्भातल्या आजाराबाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष राजन मलूष्टे,व इंफींगो चे श्री श्रीधर ठाकुरदेसाई, यांनी केले त्यावेळी व्यासपीठावर सतीश दळी, वैश्ययुवाचे वीरेंद्र वणजू, सौरभ मलूष्टे, तसेच इंफींगोचे डॉ. देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैश्य युवाचे अँड निलेश उर्फ भैय्या भिंगार्डे यांनी केले. या कार्यक्रमाला राधाकृष्ण संस्थेचे सेक्रेटरी बाबा संसारे, सुनील उर्फ दादा वणजू, रवींद्र प्रसादे, विकास मलूष्टे, अँड सिद्धार्थ बेंडके, बाबू खातू, अजय गांधी, योगेश मलूष्टे तसेच युवाचे मिलिंद दळी, सुमित संसारे, अनिश खातू , वेदांग मलूष्टे, सचिन केसरकर,प्रसाद बाष्ट्ये, कुंतल खातू, प्रज्ञेश रेडीज, मुकुल मलूष्टे, नागेश जागूष्टे, युवराज शेट्ये, निहित मलूष्टे, अँड मनोर दळी, सुनिल बेंडखळे, राजू गांगण, विजय मलूष्टे, तपन मलूष्टे, अभिन्य वणजु हजर होते.