रत्नागिरी:- दुचाकी स्वाराच्या दुखापतीस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या मोटार चालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज पुरषोत्तम वेतकर असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कशेळी ते आडीवरे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वेतकर हे मोटार (क्र. एमएच-०२ बीटी ४०३३) घेऊन कशेळी ते आडीवरे असे जात असताना वाहन निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱी दुचाकी (क्र. एमएच-०८ एडी ५४७८) ला दुचाकीच्या उजव्या बाजूला धडक दिली. या अपघात वैभव सुरेश लांजेकर (वय ३७) यांना दुखापत झाली. तसेच वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी उत्तम पिलणकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.