चिपळूण:- तालुक्यातील कोंड फणसवणे येथील राहणारा निवृत्ती जाधव (वय ३८) कराड चिपळूण रोडवर मोटारसायकलचा अपघात झाला होता त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला.
याबाबत महादेव जाधव यांनी चिपळूण पोलिसात खबर दिली आहे निवृत्ती जाधव हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन चिपळूण कराड रोडने चिपळूणकडे येत असतं मौजे चिपळूण पिंपळी तीनवड गणेशनगर येथे तो रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या अवस्थेत आढळून आला व बाजूला मोटारसायकल पडलेल्या स्थितीत आढळून आली त्यांना औषधोपचारासाठी बेशुध्द अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.