Sunday, August 9, 2026
spot_img
Home शैक्षणिक मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा

मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा

गुहागर:- शिक्षकांच्या शिकवण्याच्या
पद्धतीवरून आणि संस्थेच्या एकंदरीत कार्यपद्धती विरोधात पालकांनी आवाज उठवला म्हणून दुसरीच्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास देऊन मारहाण करणाऱ्या वर्गशिक्षिकेविरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीच्या शाळेमधील घटनेने पालकांमध्ये चीड व्यक्त होत आहे.

गुहागर पोलीस ठाण्यामध्ये एका पालकाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये त्या पालकाचा मोठा व धाकटा मुलगा या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. लहान मुलगा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असून त्याच्या वर्गशिक्षिकेचा स्वभाव तापट व रागीट आहे. मागील शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेतील शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीवरून आणि संस्थेच्या एकंदरीत कार्यपद्धती विरुद्ध काही पालकांनी आवाज उठवलेला होता.

त्या रागातून पालकाच्या लहान मुलाला संबंधित वर्गशिक्षिकेने मागील काही आठवड्यापासून शाळेतील वर्गात एका कोपऱ्यामध्ये बसवायला सुरुवात केली. तसेच मुलाला मारहाण केल्याने पालकाने तक्रार दाखल केली. त्यावरून वर्गशिक्षिकेविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.