मुलाकडून जन्मदात्या आईला अमानुष मारहाण

दापोली:- दापोली तालुक्यातील कारंजाळी येथे मुलाने आपल्या जन्मदात्या आईला काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या बाबत पीडित आईने आपल्या मुलाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. 

कारंजाळी येथे रुक्मिणी विठोबा गायकर या त्यांचा मुलगा मंगेश गायकर व त्याची पत्नीसह राहतात. मंगेश याला दारूचे व्यसन आहे दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मंगेशने दारू पिऊन आला व आपल्या अंगणात बसला होता. यावेळी त्याच्या आईने त्याला घरात ये, असे सांगितले. असे बोलल्याने त्याने आईला व शेजाऱ्यांना शिविगाळ करायला सुरुवात केली. यामुळे आईने वैतागून तू इथे राहू नकोस, मुंबईला निघून जा, असे म्हटले याचा राग येवून त्याने काठीने आईच्या दोन्ही पायावर मारहाण केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.