मुरुगवाडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या बाजूला वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

हुसेन मिया मोहमद माद्रे (वय ७७, रा. मिनारा मस्जिद जवळ, पेठ मोहल्ला सैतवडा रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुसेनमिया हे मुरुगवाडा येथील संशोधन केंद्राच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.