रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील तरुणाला नातेवाईकांनी मद्यपान करु नकोस सांगितले. याचा राग मनात धरुन तरुणाने लाकडी वाशाला नायलॉनची दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वैभव विलास पाटील (वय ३३, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव याला घरातील नातेवाईकांनी मद्यपान करुन नकोस असे सांगितले. त्याचा राग त्याला आल्यने घराचे वरच्या रुममध्ये जावून दरवाजा पुढे ढकलून रुममधील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









