रत्नागिरी:-मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी दौऱ्यात चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जमिनीवर तरी उतरले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन जमिनीवर तरी उतरले का? याचा शोध घ्यावा मग टीका करणाऱ्यांना याचं उत्तर मिळेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीवरून नाना पटोले यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. आपण गुजरातचेच पंतप्रधान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, असा टोला पटोले यांनी यावेळी लगावला. दरम्यान महाराष्ट्रावर पंतप्रधानांचं प्रेम आहे, केंद्राच्या तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि ते आमच्या अधिकाराचे पैसे आहेत भिक नाही अशा शब्दांत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झालं आहे. त्याठिकाणी एका पक्षाचं राजकारण चालतं. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर आले असता बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपाल पदाची एक वेगळी गणिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
द
रम्यान सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जी नावं पाठविण्यात आली आहेत, ती नियमाला धरून पाठवण्यात आली आहेत. जर त्याच्यात काही चुकलं असेल तर राज्यपालांनी कळवलं पाहिजे. त्याच्यात काही क्वेरी असेल तर राज्य सरकार करून देइल, मात्र त्यांची नियुक्ती थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. भाजपने या प्रकारचं कृत्य करू नये, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली..