रत्नागिरी:- पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबई-गोवा महामार्गावरून स्फोटके भरलेला टॅंकर जाणार असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर पोलीस सतर्क झाले आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी तात्काळ महामार्गावरील वाहने तपासण्यास सुरूवात केली. वांद्री येथे एक टॅंकर थांबविण्यात आला. त्या टॅंकरची तपासणी केली असता टॅंकरमध्ये स्फोटके नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कंट्रोल रूममध्ये एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की स्फोटके असलेला एक टँकर मुंबईहून गोव्याकडे जात असल्याची माहिती दिली. फोन येताच त्याप्रमाणे लागलीच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात केली होती. या नाकाबंदीदरम्यान टँकर संगमेश्वर येथे नाकाबंदीदरम्यान थांबविण्यात आला. त्याची पोलिसांनी तपासणी करण्यात केली. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारेही कसून प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्याने टँकरमध्ये कोणतेही स्फोटके नसल्याचे सिद्ध झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. तसेच आलेला फोन हा खोडसाळपणा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.