रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील चरवेली येथे टेम्पोने टँकरला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुशांत रामचंद्र गरंडे (२१, सुभाषनगर मिरज, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद संपत शंकर यादव (५५, कराड, सांगली) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत यादव हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन जयगड ते सांगली असा जात होता. मुंबई गोवा महामार्गावरील चरवेली येथे आला असता गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालक सुशांत गरंडे याने विरुध्द दिशेला जाऊन टँकरला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद टँकर चालक संपत यादव याने रत्नागिरी ग नामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार टेम्पो चालक सुशांत गरंडे याच्यावर भादविकलम २७९, मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









