रत्नागिरी:- दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सुमय्या मोहियुद्दीन सय्यद हिने शाळेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नाव कोरले जाईल अशा पद्धतीचं नावलौकिक कार्य आणि यश संपादित केलेले आहे. या विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळालेले आहेत. प्रशालेच्या इतिहासात अशा पद्धतीची कामगिरी करणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेणारे केवळ १५१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये सुमय्या मोहियुद्दीन सय्यद हीचा समावेश झाला आहे.यापूर्वीही सुमय्या सय्यद या विद्यार्थिनीने २०१८ मध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संपूर्ण कोकण विभागात उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला होता. तिच्या या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जुबेर गडकरी सर, तसेच तालिमी इमदादिया कमिटीचे अध्यक्ष श्री. अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव श्री.तनवीर मिस्त्री, सहसचिव श्री. जाहीर मिस्त्री ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार श्री. निसार लाला, संस्थेचे संचालक श्री.शकील मजगावकर, श्री रफिक मुकादम, श्री. साबीर मजगावकर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मुश्ताक आगा सर या सर्व मान्यवरांनी सुमय्या सय्यद व तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रशालेवर आणि सुमया सय्यद हिच्यावर विविध शैक्षणिक संस्थेच्या वतीने आणि सामाजिक संस्थेच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.