रत्नागिरी:- बेदरकारपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवार 16 एप्रिल रोजी दुपारी 3.35 वा.मिरजोळे एमआयडीसी येथे घडली.
या अपघातात दुचाकीवरील जखमी चालकाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, रविवारी दुपारी आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दुचाकी घेउन मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी ते गद्रे कंपनी असा जात होता. त्याचवेळी संशयित टेम्पो चालक आपल्या ताब्यातील टाटा व्ही 30 इंटेरा टेम्पो घेउन जात होता. ही दोन्ही वाहने एमएसईबी वर्कशॉपलगत असलेल्या चौकात आली असता टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सूटला आणि त्याने दुचाकीला धडक देत अपघात केला. यात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला असून टेम्पो चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.