रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथे कामाला असलेला कामगार चक्कर येऊन पडला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. पंकज पर्शुराम आखाडे (वय ३२, रा. शेंबेकर बिल्डींग, जेलरोड, गवळीवाडा, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडे हे मिरजोळे-एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला होते. अचानक त्यांना चक्कर आली म्हणून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथे काहीच फरक पडला नाही अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.