मिरकरवाडा येथे खलाशाचा फिट आल्याने मृत्यू

रत्नागिरी:- फिट आलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शाकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. नारायण रघुनाथ कोळी (वय ६४, रा. मुळ: हमरापुर वरेडी, ता. पेण जि. रायगड सध्या रा. मिरकरवाडा जेटी, मिरकरवाडा-रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण कोळी हे सौ. श्रद्धा पाटील (रा. पाटीलवाडी, मिरजोळे) यांच्या राजलक्ष्मी-२ या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते. त्यांना फिट येण्याचा आजार होता. मंगळवारी बोट मिरकरवाडा बंदरात नांगरुन ठेवत असताना अचानक त्यांना फिट आली. मात्र प्रथमोपचार करुन ते शुद्धीवर आले. मात्र दुपारी दोन च्या सुमारास खबर देणार हे उठवत होते. मात्र त्यांची हालचाल दिसून आली नाही. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.