मास्क वापरला नाही म्हणून गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोरोना संसर्गकाळात सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुरुवार २३ डिसेंबर सायंकाळी कारवांचीवाडी फाटा येथे करण्यात आली. विक्रांत शशिकांत शेलार ( ३५ ,रा.सोमेश्वर शेलारवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल सावंत करत आहेत.