मासेबाव येथे ट्रेलरची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील मासेबाव रस्त्यावर वळणावर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वारासह त्याची पत्नी जखमी झाली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) सकाळी पावणे दहाच्या सुमारास मासेबाव येथील सुधाकर सुर्वे यांच्या बागेसमोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्याी रवींद्र गोविंद पाचकुडे (वय ४३, रा. करबुडे मावळती पाचकुडेवाडी, रत्नागिरी) हे त्यांची पत्नी सौ. अस्मिता पाचकुडे असे दुचाकी (क्र. एमएच-०८ पी ४४१२) वरुन रत्नागिरीकडे येत होते. सकाळी करबुडे फाटा ते निवळी येथील मासेबाव येथील वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रेलर (क्र. के. ए. २२ डी ५५०३) वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात. स्वारासह त्याच्या पत्नीच्या हाताला, डोक्याला दुखाप झाली. या प्रकरणी रविंद्र पाचकुडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.