Tuesday, June 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी मावळंगे येथे झाडावरून पडून गंभीर जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

मावळंगे येथे झाडावरून पडून गंभीर जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- आपल्या घराच्या परिसरात असलेल्या पेरूच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रभाकर रामचंद्र शिंदे (वय ६२, रा. मावळंगे, वरची गुळेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर शिंदे हे आपल्या राहत्या गावी पेरूच्या झाडावर चढले असता, अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली, विशेषतः त्यांच्या मानेला गंभीर फॅक्चर झाले होते. त्यांना तातडीने रत्नागिरीतील चिराय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

​मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलच्या वॉर्ड क्र. ०२ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे १४ मे रोजी सकाळी १० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सुरुवातीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तिथून सर्व कायदेशीर कागदपत्रे टपालाद्वारे रत्नागिरी पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर, आता रत्नागिरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्रमांक २०/२०२६) करण्यात आली आहे.