माळनाका तारा पार्क येथे 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील जुना माळ नाका येथील तारा पार्क या इमारतीच्या टेरेसवर खेळणाऱ्या 11 वर्षीय मुलीचा कपड्याच्या दोरीत अडकून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना समोर आली.

बुधवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना कनिका चुनेकर ही 11 वर्षीय मुलगी टेरेसवर खेळत होती. बराच वेळ मुलगी घरात न आल्याने मुलीची आई टेरेसवर शोधण्यासाठी गेली असता कनिकाच्या गळ्यात कपडा अडकलेला पहिला. कपड्यात गळा अडकल्याने कनिकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
 

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मूलगीचा या घटनेत मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पोलिसांचा या घटनेबाबत  सखोल तपास सुरू आहे.