मालगुंड समुद्रकिनारी मद्यपान ; प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथील समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हरिश्चंद्र मयेकर (वय ४४, रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास मालगुंड समुद्रकिनारी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित समीर मयेकर हे मालगुंड येथील समुद्रकिनारी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.