मालगुंड किनाऱ्यावरून आणखी 386 कासवांची पिल्ले समुद्राकडे

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या मालगुंड गायवाडी बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाच्या अंड्यांचे संवर्धन गेल्यावर्षीपासून सुरू आहे. या वर्षी ह्या बीचवर 2 जानेवारी पासून कासवांची घरटी सुरू झाली. आतापर्यंत एकूण 48 घरटी झाली असून त्यात सुमारे 4891 अंडी संवर्धित केली गेली आहेत. त्यापैकी पाहिले घरटे 26 फेब्रुवारी रोजी पहिले घरटे उघडले गेले.

त्यातील 68 पिल्ले समुद्रात झेपावली, तर दिनांक 8 मार्च रोजी एकूण 5 घरटी उघडली गेली असून त्यातील सुमारे 386 पिल्ले रत्नागिरी चे फॉरेस्टर श्री. गावडे तसेच रत्नागिरी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर आणि स्थानिक ग्रामस्थ ह्यांच्या सहकार्याने समुद्रात सोडण्यात आली.

यावेळी मालगुंडचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मालगुंड तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, रत्नागिरी तालुका युवा सेनेचे तालुका युवा समन्वयक साईनाथ जाधव, हॉटेल व्यावसायिक संदीप कदम, शेखर खेऊर आदींसह कासवमित्र ऋषिराज जोशी व रोहित खेडेकर उपस्थित होते.