मारुती मंदिर येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मारुती मंदिर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. श्रेयस दिलीप सावंत (वय २४, रा. आंगले, सावंतवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मारुती मंदिर स्टेडिअमच्या बाहेर निदर्शनास आली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत अशताना आढळला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.