रत्नागिरी:- शहरातील मारुतीमंदिर येथे दुचाकीची धडक बसून रस्ता ओलांडणारा प्रौढ गंभिर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना शनिवार 13 एप्रिल रोजी रात्री 8 वा. घडली.
विजय सुनिल शेटे (44, सध्या रा.शिळ कदमवाडी मुळ रा.मुंबई) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. शनिवारी रात्री ते पत्नीसह मारुती मंदिर येथील संगम स्विटस येथून दुभाजक ओलांडून पलीकडील योजक या दुकानात जात होते. ते मारुती मंदिर ते माळनाका जाणार्या रस्त्यावर आले असता भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांला धडक देत अपघात केला. यात विजय शेटे यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.









