रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते साळवी स्टॉप जाणारा रस्ता आणि जे.के.फाईल्स ते शिवाजी नगर जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने दोन टेम्पो उभे करणाऱ्या चालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.10 ते 7.25 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
सलमान सैय्यददिन शेख (36,रा.एमआयडीसी मिरजोळे,रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील टेम्पो(एमएच-08-एपी-2665) तर मंगेश दत्ताराम करंजवकर (56,रा.कासारवेली,रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-08-एपी-3861) ही इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने उभी केली होती. त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









