रत्नागिरी:- बसल्या जागीच बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शिरिषकुमार चंद्रहास प्रभू (वय ६५, रा. आकारा स्वरुप अपार्टमेंट बाबादेसाई मार्ग, मारुतीमंदिर रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत शिरीषकुमार प्रभू हे घरी अशताना बसल्या जागी बेशुद्ध झाले. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.









