खेड:- भरणे येथून कडाप्पा मार्बलचा माल माटवण येथे घेऊन जाणाऱ्या टेंपोला (एमएच-०८-डब्लू ०१५८) अचानक आग लागली. त्यामध्ये टेंपो जळून खाक झाला. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. खेड पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. ही घटना मंगळवारी (ता. २९) घडली.
खेड-मंडणगड मार्गावर धामणी गावाजवळ टेंपोला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर खेड पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब आणि पालिकेचे अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहायक फायरमन प्रणय रसाळ, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधर पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन बंबाच्या साह्याने पाण्याचा फवाऱ्याचा मारा सातत्याने करून आगीवर नियंत्रण मिळविले, टेंपोचालकाने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला; पण टेंपोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून, नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.