माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणात 143 कोरोना पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण

रत्नागिरी:- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार 299 जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (कोमोर्बिड) 76 हजार 684 रुग्ण असून त्यांची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या 598 जणांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 143 पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले.

 ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार 299 जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (कोमोर्बिड) 76 हजार 684 रुग्ण असून त्यांची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या 598 जणांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 143 पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले.
आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सुरु केली आहे. सर्व्हेक्षणाची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जाहीर केली नव्हती. बुधवारी (ता. 30) मंत्र्यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी मोहिम प्रभावीपणे सुरु असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात 4 लाख 40 हजार 572 घरातील 15 लाख 42 हजार 612 लोकांची तपासणी करण्याचे लक्ष आहे. तपासणीसाठी 1,602 गावात 686 पथके असून 2,026 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 15 सप्टेंबरनंतर आतापर्यंत 62.77 टक्के सर्व्हेक्षण झाले. त्यात 2 लाख 76 हजार 560 कुटूंबातील 9 लाख 69 हजार 299 लोकांची तपासणी केली.  यामध्ये ‘सारी’ रोगाची लक्षणे असलेले 169 रुग्ण आढळले. त्यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 112 रुग्ण आहेत. सर्दी, खोकला, ताप लक्षणे असलेले 1070 रुग्ण, कोमॉर्बिड म्हणजेच कोरोनासाठी अतिगंभीर ठरणारे (उदा. मधुमेह, ह्यदयरोग यासारखे) रुग्ण 76 हजार 684 आहेत. एकुण सर्व्हेक्षणातील 721 रुग्णांची कोरोना तपासणी केली. त्यातील 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये ग्रामीण भागातील 120 रुग्ण असून शहरातील रुग्ण 23 आहेत. चिपळूण, संगमेश्‍वर, खेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. शहरी भागातही चिपळूण पालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या अधिक आहे.