अमित घोसाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
रत्नागिरी:- शिंदेसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुलगा अमित जयसिंग घोसाळे (४५) यांचे सोमवार ७ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी नेण्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच मित्रपरिवारासह शिंदे शिवसेनेत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे वडील आबा घोसाळे यांचा शिवसेनेत दांडगा जनसंपर्क आहे. अमित घोसाळे हे कामानिमित्त दापोली येथे गेले होते. सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. मंगळवारी पहाटे त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. आबा घोसाळे यांच्या मुलाच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी तात्काळ आंबेशेत येथे त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली. अमित घोसाळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे