मांडवी किनारी अनोळखी प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी:-गुरुवारी सकाळी 6 वा.सुमारास मांडवी समुद्रकिनारी अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

याबाबत नगरसेवक संतोष दत्‍तात्रय किर (46, रा.मांडवी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.त्यानूसार, गुरुवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी मांडवी समुद्र किनारी गेले असता त्यांना ब्रीजजवळ अंदाजे 45 ते 50 वय असलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती शहर पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.