रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास महिन्याभराच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार 2 हजार 757 कोरोना चाचण्यांमध्ये 103 पॉझिटिव्ह रुग्ण भेटले आहेत. तर 2 हजार 654 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 82 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 876 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.00 टक्के आहे. नव्याने 103 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 992 इतकी झाली आहे.
कोरोनाने 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 423 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 409 तर संस्थात्मक विलगीकरणात 284 रुग्ण उपचार घेत आहेत.