ठाकरे गटाचे संजय पुनसकर यांचा थेट आरोप
रत्नागिरी:- रत्नागिरीत उद्यमनगर परिसरात यापूर्वी शासकीय महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. पण हे महिला रुग्णालय सुरू न होता त्याठिकाणी कोरोनात बालरुग्णालय आणि आता शासनाकडून जीआर पास करून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेय. त्यामुळे महिला रुग्णालय सुरू न करता जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी पवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा शासन आदेश 2022 मध्ये पारित झाला. यासंदर्भात ठाकरे गट शिवसेनेतर्फे बुधवारी येथील खासदार संपर्प कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकापमुख पदीप उर्प बंड्या साळवी, ज्येष्ठ नेते पमोद शेरे, शहर पमुख पशांत साळुंखे, माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग उर्प आबा घोसाळे, उपजिल्हापमुख संजय साळवी यांची उपस्थिती होती.
या पत्रकार परिषदेत जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे बोलण्याचा रोख ठेवला. आज जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांची कमतरता पकर्षाने मांडली. रुग्णालयात मंजूर असलेल्या 30 अधिकाऱयांपैकी केवळ 9 वेद्यकीय अधिकारीच उपलब्ध आहेत ते देखील 11 महिन्यांच्या कंत्राटी पध्दतीने मुदतीवर आहेत. बालरोग तज्ञ, भुलतज्ञांचा थांगपत्ता नाही. दररोज मोठ्या पमाणात ओपीडी असते. सद्या रुग्ण दगावण्याचे पमाणही सर्वाधिक आहे. तालुक्यांच्या ठिकाणी संगमेश्वर, गुहागर, दापोली, लांजा, राजापूर आदी ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱयांची कमतरता आहे.
पण पालकमंत्री उदय सामंत हे त्या रिक्त पदांच्या भरतीबाबत काय भूमिका घेतात असा सवाल पुनसकर यांनी उपस्थित केला. त्यांच्याकडे राज्याचे उद्योग खाते आहे, पण ते आरोग्य यंत्रणेवर बोलताना दिसत असल्याचा टोला पुनसकर यांनी लगावला. उद्यमनगर येथे महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. पण महिला रुग्णालयच रत्नागिरीत नसल्याचे सांगितले. कारण शासनाकडून त्या जागी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करून जनतेची दिशाभूल केल्याचा आक्षेप पुनसकर यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मर्जी राखण्यासाठी सर्व काम सुरु असल्याची टिका त्यांनी केली. मंत्रीमंडळात बैठक घेत येथील महिला रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.