रत्नागिरी:- महावितरण कंपनीने आपली सेवा अधिक लोकाभिमुख करण्याच्यादृष्टीने ‘एक गाव एक दिवस’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत खराब विद्युत खांब त्वरित बदलणे, खाली लोंबकळणार्या तारा ताणणे, वीज बिल तक्रारी निवारण, नादुरुस्त मीटर बदलणे ही कामे करण्यात येतात. महाराष्ट्रातील या उपक्रमाला तालुक्यातील चांदोर गावातून सुरवात करण्यात आली.
कार्यकारी अभियंता बेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग रत्नागिरीचे (ग्रामीण) उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी चांदोर गावातील वीज तारा, खांब याबद्दलच्या अडचणी सोडविल्या. पूर्ण खराब झालेले 12 खांब त्वरित बदलण्यात आले. याशिवाय 14 आधार स्टाय नव्याने टाकण्यात आले. लोंबकळणार्या विद्युततारा ताणण्यात आल्या. वीज बिल तक्रारी निवारण लेखा विभागातील अधिकार्यांनी केले. 42 नादुरुस्त मीटर बदलले. ही सर्व कामे एकाच दिवशी करण्यात आली. अन्य शाखा कार्यालयातील मिळून 22 तांत्रिक कामगार, मे. आस्था इलेक्ट्रिकल, मे. डांगे इलेक्ट्रिकल व एस. आर. इलेक्ट्रिकल यांचे सहकार्य घेतले. शोण चारोस्कर, ऋषिकेश करंबेळकर, कळेकर, माने व राठोड हे अभियंता व सहाय्यक लेखापाल फडके, रघुनाथ पालकर असे सुमारे 75 कर्मचारी व अधिकारी मोहिमेत सहभागी झाले.
या वेळी महावितरण कंपनीने सुरू केलेल्या मोबाईल अॅप तसेच ऑनलाइन बिल भरणा प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
आदेश सर्व कार्यकारी अभियंत्यांना स्थानिक ग्रामस्थ, सरपंच कोकरे यांच्यावतीने कार्यकारी अभियंता बेले यांचे या वेळी विशेष कौतुक करून त्यांचा सत्कार केला. या मोहिमेबद्दल मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या लोकाभिमुख मोहिमा कोकण परिमंडळ अंतर्गत राबविण्याचे आदेश सर्व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.