महायुती सरकार विरोधात ठाकरे गट आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचे आज आंदोलन

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या गलथान कारभार दररोज चव्हाट्यावर येत आहे. याविरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महायुती सरकारविरोधात रत्नागिरीत शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येणार आहे. आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जयस्तंभ येथे शिवसैनिक आंदोलन करणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. राज्याचे कृषी मंत्री रमी खेळताना सापडतात. शिंदे गटाचा आमदार कॅन्टीनमधील कामागाराला मारायला जातात. गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबारवर धाड पडते. पैशाने भरलेली बॅग घेऊन बसलेला मंत्री हे सर्व कारनामे बाहेर पडल्यानंतर राज्यात सरकार विरोधात अंसतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे.

महाराष्ट्रातील भ्रष्ट व गैर कृत्ये करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीशी न घालता राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहे.