महामार्गावर बेदरकारपणे ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील वळणावर बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणार्‍या ट्रकला धडक देत अपघात केला.याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी 11.45 वा.सुमारास घडली.

राशिद खान गया सिध्दिनखान (रा.कन्नोज,उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात दिपक दादासो थोरात (30,रा.घोगाव,कराड) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार, गुरुवारी दिपक थोरात आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-50-2952) घेउन जाकादेवी ते कराड असे जात होते.त्याच सुमारास राशिद सिध्दीनखान आपल्या ताब्यातील ट्रक (जीजे-15-एव्ही-0455) गोवा बाजुकडून घेउन येत होता.हे दोन्ही ट्रक कापडगाव येथील वळणावर आले असता राशिदने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना थोरात यांच्या ट्रकला समोरुन जोरदार धडक दिली.या अपघातात एका वॅगनार कारचेही नुकसान झाले असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.