राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर उन्हाळे कुंभारवाडी नजीक आयशर टेम्पो मातीच्या भरावावर चढून पलटी झाल्याने झालेल्या अपघात टेम्पो चालक दिलीपकुमार नरेश सिंह (वय २३ रा. शेहुचंदपूर, बेगनी, उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला आहे. रविवारी सकळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
गोवा वेरणे येथून केबल भरून हा टेम्पो उत्तरप्रदेशकडे जात होता. टेम्पो चालक दीलीपकुमार नरेश सिंह व क्लीनर अनुज सिह असे दोघेजण या टेम्पोत होते. रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान टेम्पो राजापूर उन्हाळे नजीक आला असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा टेम्पोवरिल ताबा सुटला व टेम्पो रस्त्याच्या लगत असलेल्या मातीच्या भरावावर चढला. याच दरम्यान अपघातातुन वाचण्यासाठी टेम्पो चालक दिलीपकुमार नरेश सिंह याने टेम्पो बाहेर उडी मारली. मात्र भरावावर चढलेला टेम्पो तेवढ्याच गतीने मागे आल्याने या टेम्पोखाली चिरडून चालक दीपीलकुमार याचा जागीच मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, पोलीस हेडकांस्टेबल कमालकर तळेकर, पोलीस गोनिलवार, सचिन बळीप, चालक घोगले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत चालकाचा मृतदेह तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. पोलीसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल कमलाकर तळेकर करत आहेत.