खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी नजीक तुळशी खेड या बसला कंटेनरने पाठीमागून दिल्याने अपघात झाला. या धडकेत बसमधील वाहकासह ५ विद्यार्थी जखमी झाले. अपघात शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला
कळंबणी नजीक प्रवाशी घेण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला थांबली असता कंटेंनरने पाठीमागून ठोकर दिली. वाहक संजय साळवी यांच्यासह जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.