रत्नागिरी:- मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात राज्य सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजासमोर जे काही आश्वासन दिलं होतं, त्याच्याबरोबर उलट आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये जाऊन दिलं. त्यामुळे मराठा आरक्षणावरती आता उपमुख्यमंत्री यांनी बोलावं आणि तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पहावं, सरकार आता कंत्राटी पद्धतीने मंत्रीपद देणार का, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीच्या पार्श्वभमुमीवर वरूण देसाई हे शनिवारी रत्नागिरीत आलेले होते. त्यावेळी त्यांनी या निवडणूकीसंदर्भात येथील शिवसेना पदाधिकाऱयांशी बैठकीत चर्चा केली. हि निवडणूकीतील तांत्रिक बाबी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकणात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 2018 ला पहिल्यांदाच शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी कमी फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. पण आता या निवडणूकीची उध्दव ठाकरे शिवसेना गटातर्फे तयारी सुरू झालेली आहे. त्याबाबत अंतिम उमेदवार पक्षपमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. पण मुंबई व कोकण याठिकाणी या निवडणूकीसाठी पदवीधरांसाठी नोंदणी काटेकोर करण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्व कार्यकर्ते काम करत असून तांत्रिक मार्गदशनासाठी हा कोकण दौरा असल्याचे वरूण देसाई यांनी सांगितले.
राज्यात पदवीधरांमध्ये मोठ्या पमाणात बेरोजगारीचा पश्न आहे. पण आताच्या आमदारांनी पदवीधरांची कोणतीही समस्या मांडलेली नसल्याचे देसाई यांनी म्हटले. ती या निवडणूकीला सामोरे जात असताना समोर ठेवली जाणार आहे. राज्यातील कानाकोपऱयात बेरोजगार असलेल्या युवकांकडे राज्यकर्त्यांनी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आज केवळ मराठाच नाही तर अनेक समाजाचे आरक्षणासाठी मोर्चै निघताहेत. पण सरकारमधील एक मंत्री त्यांना सामोरे जाउन एक आश्वासन देत असताना दुसरा मंत्री त्यापेक्षा उलट आश्वासन देतोय. त्यावर सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावे असेही वरुण देसाई म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे
तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पहावं. गेले एक सव्वा वर्ष अनेक लोकांची जॅकेट तयार आहेत. नवीन बुटांना पॉलिश करून बसलेत, पण त्यामुळे सरकार आता कंत्राटी पद्धतीने मंत्रीपद देणार का, असा सवाल वरूण देसाई यांनी केला आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आपण बोलू नाही तर शोले चित्रपटाप्रमाणे कब है होली, कब है होली त्याप्रमाणे कब है मंत्रिमंडळ विस्तार अशी विचारण्याची वेळ येईल. मुंबई आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.