मद्यधुंद अवस्थेतील प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा रस्त्यावर प्रौढ दारुच्या मद्यधुंद अवस्थेत सापडला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम वामन रहाटे (वय ५२, रा. वाटद, परटवणे, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी दीडच्या सुमारास वाटद रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्ताराम दारुच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हवालदर प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.