रत्नागिरी:- शहरानजीकच्या मजगाव येथून 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 वा.तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
साकीब अब्दुल सत्तार कासु (22, रा.सनराईज रेसीडेन्सी मजगाव,रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याचे वडील अब्दुल सत्तार रहिमान कासु (50, रा.सनराईज रेसीडेन्सी मजगाव,रत्नागिरी) यांनी 7 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती.त्यानूसार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी साकिब त्याचा मित्र हुजेफ याला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जातो असे आपल्या आईला सांगून घरातून निघून गेला होता.परंतू तो पुन्हा घरी न परतल्याने आजुलबाजुला तसेच नातेवाईक आणि साकिबच्या मित्रांकडे चौकशी करुन त्याच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
साकिबची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा आहे.बांधा सडपातळ,केस आणि दाढी काळी बारीक,अंगात कॉफी कलरचे चेक्स शर्ट व नेव्ही ब्ल्यु कलरची ट्रॅक पॅन्ट,पायात चप्पल असा वेश परिधान केलेला आहे.