रत्नागिरी:- शहरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५५ वाजण्यापूर्वी घडली. अम्मार नासिर कालसेकर (२६, रा. मजगाव, मुस्लिम मोहल्ला) या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कोणी नसताना घराच्या माळ्यावर जाऊन, लाकडी पेटीवर चढून, ओढणीने घराच्या वाशाला फास बांधला. पेटीवरून उडी मारल्यामुळे गळफास घट्ट बसून तो बेशुद्ध अवस्थेत टांगलेला आढळला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









