रत्नागिरी:- शहरातील मच्छीमार्केट परिसरातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना सोमवार 25 मार्च रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली आहे. अलताब महम्मद शेख (15, रा. मच्छिमार्केट, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत त्याचे वडीत महम्मद तालीम सलीम शेख (37,रा.मच्छिमार्केट,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, सोमवारी अज्ञाताने त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेले आहे. त्यांनी आजुबाजुला मुलाचा शोध घेतला परंतू तो कोठही मिळून न आल्याने अखेर त्यांनी श्हार पोलिस ठाण्यात धाव घेत खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.