मंगळवार बाजार येथे गवताला आग

रत्नागिरी:- शहरातील नाचणे मार्गावरील मंगळवार बाजार भरणाऱ्या पटांगणातील गवताला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. वाऱ्यासोबत आग पसरत गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाल्याने नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मोकळा भाग असल्याने मोठी हानी टाळली.