भोस्तेतील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील भोस्ते-जसनाईक मोहल्ला येथील २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरबार रेहमत अली शेख असे मृत तरुणाचे नाव आहे.
त्याला ३० सप्टेंबरपासून पोटात दुखून नैसर्गिक विधी व लघवी होत नव्हती. येथील एका खासगी डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकृती गंभीर बनल्याने रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. याबाबत पत्नी जरीना दरबार शेख यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली.