भूमाफियांच्या भल्यासाठीच रिफायनरी प्रकल्प: खा. राऊत

रत्नागिरी:- परराज्यातून बाहेरून आलेल्या पैशावर बारसू रिफायनरीला स्थानिक विरोध करत होते, असा आरोप करत स्वभिमानी कोकणी जनतेचा अपमान, बदनामी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस सभागृहात करत होते. यावेळी कोकणच्या मातीतील पालकमंत्री, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उद्योगमंत्री ना.उदय सामंत हे हसून त्यांना दाद देत होते. यांनी सत्तेसाठी आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे. यांना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना वाचविता आले असते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माणसांना कंटाळूनच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी जाहीर मेळाव्यात केला. रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने रत्नागिरी शहरातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. विनायक राऊत बोलत होते.

शहर शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला राजापूरचे आमदार राजन साळवी, लोकसभा मतदार संघ संमन्वय, प्रदीप बोरकर, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साUवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग तथा आबा घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुका संघटक प्रसाद सावंत, संजय पुणसकर, उपजिल्हा प्रमुख ॲड.सुजित कीर, महिला जिल्हाप्रमुख सौ. वेदा फडके, महिला तालुकाप्रमुख सौ. साक्षी रावणंग, महिला शहर प्रमुख सौ. मानिषा बामणे यांच्यासह हजारो शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते. मराठा मंडळाचा हॉल गर्दीने फुल्ल झाला होता. तर बाहेरील परिसर शिवसैनिकांनी भरला होता.

खासदार विनायक राऊत यांनी आपल्या घणाघाती भाषणात पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. गद्दार गटाच्या नेत्यांनी हिम्मत असेल तर हा विराट मेळावा येऊन पहावा. पैसे देऊन आणलेली ही गर्दी नव्हे तर हे शिवसेनेचे निष्ठावान शिलेदार आहेत. येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत हेच निष्ठावान गद्दारांना घरी पाठवणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आहे. हे येणार्या निवडणुकीत स्पष्ट होईल. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकेल असा विश्वास खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

शिंदे गट, भाजपमध्ये हूजरेगिरी करणार्यांना सध्या जवळ केले जात आहे. भाजपने अँड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासारख्या पक्षावर निष्ठा असलेल्या व्यक्तींना बाजूला केले. तर गद्दारांना जिल्हाध्यक्ष केल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. भारतीय जनता पार्टीत सध्या हुजरेगिरी करणार्यांना अधिक संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
भर सभागÉहात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माPया कोकणातील स्वाभिमानी जनतेचा अवमान केला आहे. दुसर्यांच्या पैशावर बारसूतील आंदोलन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री , उद्योग मंत्री ना. उदय सामंत त्यांना हसून दात देत होते. यासारखे रत्नागिरीकराचे दुर्दैव नाही. देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री आहेत. त्यांनी हिम्मत असेल तर, ज्याच्या खात्यावर पैसे आलेत अशा आंदोलकाचे नाव जाहीर करा असे खुले आव्हान खा.राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमच्या आंदोलनामुळे रिफायनरी पाकिस्तानात गेली असेल तर आमची ताकद काय आहे हे तुम्हाला समजले असेल. रिफायनरी पाकिस्तानात जाणार असेल तर तिची पाठवणी करायला आम्ही तयार आहोत असेही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गÏामीण व शहर या दोन्ही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. तो कायम राहील. येणार्या निवडणुकीत गद्दारांना गाडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच आमदार होईल तर राजापूर मध्ये राजन साळवीच विधानसभेचे उमेदवार असतील अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी मांडली.
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना धमकी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या माणसांना कंटाळूनच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली हे उघड आहे. त्यांना कोणाकोणाच्या धमक्या येत होत्या यांची नावे हिम्मत असेल तर जाहीर करा. खरतर कालाप्रेमी ना.उदय सामंत यांनी सरकारच्या माध्यमातून नितीन देसाई यांना सावरण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. परंतु आता शिवसेना नितीन देसाई यांचा कर्जत येथील स्टुडिओ कोणाच्याही घशात घालू देणार नाही. प्रसंगी संघर्षाची वेळ आली, तर ती करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे असेही खासदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी मेळाव्यात आमदार राजन साUवी, राजेंद्र महाडिक, बंड्या साUवी, प्रमोद शेरे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर राजिवडा, कोकणनगर येथील मुस्लिम बांधव,महिलांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.