भिले येथे अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- भिले बसथांबा येथे तीव्र उताराच्या वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या करंबवणे येथील २९ वर्षीय रसिक सिद्धार्थ पवार याचा १४ मार्च रोजी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

८ मार्च रोजी रात्री १० वाजता मिले बस थांबा येथे चिंचेच्या झाडाजवळ तीव्र उताराच्या वळणावर रसिकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या गटारात दुचाकी पडून अपघात झाला होता. यावेळी त्याच्या डोक्याला सरगंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी मृत्यू झाला.